मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 6 हजार 767 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 868 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 867 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 हजार 440 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.28 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 73 हजार 560 आहेत.
देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत.राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 47 हजार 190 झाला आहे. त्यातील 13 हजार 404 बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 28.18 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 577 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबईत 28 हजार 817 कोरोनाबाधित आढळले आहेत त्यातील 949 जणांचा बळी गेले आहेत.