जळगाव जिल्ह्यात डुकरांचे लसीकरण पूर्ण असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वराह (डुकरांमध्ये) आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वराह ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील खबरदारी म्हणून त्याआधीच वराह लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विभागाने दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये अफ्रिकन स्वाईन फिवरची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे वराह मारण्याचे वराहाचे मटन खाण्यावर देखील बंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात वराह पशुधन जवळपास दहा हजार आहे. मात्र आफ्रिकन स्वाईन फिवर येण्यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व वराहांना लसीकरणाचा कार्यक्रम जळगाव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी दिली आहे.
अफ्रिकन स्वाईन फिवरची लक्षणे ताप, खाणे बंद होणे, त्वचेवर किंवा अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्राव होणे, कोणतेही लक्षण न दाखवता मृत होणे हे लक्षणे आहेत. मानवामध्ये याचा प्रसार होत नाही.