जळगाव शहरातील शाहू नगरातील घटना


जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकीच्या नुकसानीवरून वाद होऊन एका तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शाहुनगरात १५ रोजी घडली. याप्रकरणी शाहुनगरातील एका जणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासीर शब्बीर भिस्ती (४५, रा. शाहू नगर) असे जखमी इसमाचे नाव आहे. शाहू नगरात ते रविवारी दुपारी दुचाकीचे नुकसान झाल्याच्या कारणाने वाद होऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. नासिरच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अलका वानखेडे करीत आहेत.









