मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले येत्या काळात बेरोजगारी वाढणार आहे याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सामनाच्या रोखठोक या सदरात त्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे.
संजय राऊत म्हणाले,’करोनाच्या संकटामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता केलं आहे. सामनाच्या रोखठोक या सदरात त्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे. संजय राऊत म्हणतात, ‘महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.’