चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) : दुचाकीचोरी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५२ हजार रूपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यातील एक चोर नाशिकचा तर दुसरा चाळीसगाव येथील असून चोरटे हे रेकॉडवरील गुन्हेगार असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिली.
चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरातून रोहीत आनंद म्हसदे (वय ३०,रा. लेंडाणे ता. मालेगाव ह. मु.अवधूतरोड, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक) व सलमान बशिर पठाण (वय २२, रा. वरखेडी ता. पाचोरा, ह.मु. जहागिरदारवाडी, चाळीसगाव) यांना संशयावरून ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद केली आहे.