जळगाव— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉक्टर हर्षल माने पुरस्कृत आंतर शालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धा १५ वर्षे वयोगटात मनपा स्तरीय स्पर्धेत गोदावरी स्कूल उपविजेतेपद पटकवले.गोदावरी संघाने उपांत्य सामन्यात पोदार इंटरनैशनल स्कुलला २-० गोल ने पराभूत केले. व अंतिम सामन्यात ०-० गोल ने सामना बरोबरित सुटला. नंतर पेनल्टी शूट मध्ये २-३ गोलने सामना ंग्लोने जिंकला.पारितोषिक वितरण समारंभविजयी,उपविजयी व तृतीय क्रमांकाच्या संघांना ट्रॉफी व सुवर्ण, रजत व कास्यपदक डॉक्टर हर्षल मनोहर माने – पाटील यांच्या माध्यमाने देण्यात आले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व प्राचार्या निलिमा चौधरी यांनी खेळाडुंचे यशाबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र हॉकीच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे तसेच हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, गोदावरीचे प्रा. डॉ. आसिफ खान हे होते. व्यासपीठावर क्रीडा अधिकारी मीनल थोरात, सुजाता गुल्हाने व सचिन निकम, हॉकी जळगावचे ऍड आमिर शेख, हिमाली बोरोले, हर्षदा माळी ,अब्दुल मोहसीन, अँग्लो चे शहबाज शेख, मुजफ्फर शेख, एम आय तेलीचे अय्युब शेख यांची उपस्थिती होती.प्रा. डॉ. आसिफ खान यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडुंना लाभले.