जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथे सौ.हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक पालक सभा आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.पी.आय.ज्योत्स्ना पाटील या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेची संस्थापक आप्पासाहेब जगतराव बारकू पाटील शालेय समितीचे चेअरमन प्रमोद जगतराव पाटील ,शाळेच्या प्राचार्य .कल्पना प्रमोद पाटील , योगिता भागवत अस्वार (शिक्षक पालक संघाच्या सदस्या) ,मनोहर जगदीश मुळे. (शिक्षक पालक संघाचे सदस्य) होते.
शिक्षक पालक संघाच्या सभेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका यांनी सखी सावित्री समिती स्थापन करण्याची का गरज आहे ? सखी सावित्री समितीचे कार्य हे माता पालक यांना समजावून सांगितले व सखी सावित्री समितीचे महत्त्व पटवून दिले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना पाटील यांनी बाल गुन्हेगारी व बालगुन्हेगारीचे होणारे परिणाम शिक्षा या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपला विद्यार्थी शाळेत काय करतो कसा अभ्यास करतो याविषयी पालकांनी लक्ष देणे कसे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर पालकांना शाळेतर्फे स्नेहभोजन दीले गेले सभेला असंख्य पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ज्योती सोनवणे यांनी तर आभार कमिनी पाटील यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.