गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी ) ;- गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये ’मॅथ क्लब’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ’व्हेजिटेबल मार्केट’ उपक्रमार्तंगत गणित विषय सोपा करून शिकवण्यात आला.
या अनोख्या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात गणिताच्या संकल्पना कशा लागू होतात आणि अत्यंत सोप्या पध्दतीने गणित शिकता येते हा होता. या व्हेजिटेबल मार्केटचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निलीमा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलेया ऍक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या खरेदी-विक्रीस ठेवल्या होत्या त्यात त्यांनी भाज्यांचे वजन, किंमत, एकूण रक्कम यांची गणना करण्याचा अनुभव घेतला. गणितातील संख्याशास्त्र, गणना, वजने आणि मापे यांचा वापर करून विद्यार्थी खरेदी-विक्री प्रक्रिया शिकले. या कार्यक्रम शाळेच्या गणित विभाग प्रमुख कोमल चौधरी व व त्यांचे सहकारी यांनी पार पाडली.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गणित विषयातील आवड वाढण्यास मदत होते, तसेच ते व्यवहारिक ज्ञानाचे महत्व शिकतात. या ऍक्टिव्हिटीला विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनीही चांगला प्रतिसाद दिला.शाळेच्या मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केलेया ऍक्टिव्हिटी मध्ये मुख्याध्यापकापासून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खरेदीचा आनंद घेतला.असे शैक्षणिक उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असे आश्वासन प्राचार्य निलीमा चौधरी यांनी दिले.