मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडलीय. वांद्रे इथं इमारतीवरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
बांद्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून जीवन संपवलं.
मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली. सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. बांद्र्यातील घरात ही घटना घडली. आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मलायकाचा घटस्फोटीत पती अरबाज खान कुटुंबियांसह बांद्र्यातील घरी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले .