जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कैलास सोमा सानप यांची बिनविरोध निवड झाली. त्या वेळी शरद पुडलीक घुगे ,सेक्रेटरी दिलीप चव्हाण, माजी चेअरमन विलास घुगे, माजी चेअरमन कांतीलाल सानप ,व्हाईस चेअरमन गजानन पाटील ,सरपंच किरण प्रल्हाद घुगे, उपसरपंच सुभाष पवार उपस्थित होते.
यावेळी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रसंगी माजी चेअरमन विष्णू वासुदेव घुगे ,वासुदेव राजाराम घुगे ,रामकृष्ण नारायण पोळ, संजय भागवत घुगे, सुनील बाबुराव लाड, अतुल मदन घुगे, रविंद्र भागवत घुगे, कडूबा वामन घुगे, सुधाकर पाटील, भगवान पाटील, कडूबा वामन घुगे, संचालिका शोभाबाई ढाकणे, अरुण सोमा सानप, विलास सानप, रंगनाथ सानप, सतिष घुगे, विजय लाड, महेश सानप, योगेश सानप, मुकेश सानप, गणेश सानप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.