जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेगोळा गावाजवळ पुखराज डांगी यांच्या शेतामध्ये वापरत नसलेल्या विहिरीत बिबट्या पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाला माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून त्याचा दफनविधी केला.
जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावाजवळ पुखराज डांगी यांच्या गट नंबर ५८ या शेतामध्ये वापरात नसलेल्या विहिरीमध्ये तीन वर्ष वयाचा बिबट्या हा रात्रीच्या सुमारास पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली घडली. याबाबत माहिती मिळताच वन संरक्षक उमेश बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित यांनी घटनास्थळी जाऊन विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.
बिबट्या पाण्यात पडल्यामुळे फुगला होता. यामुळे जागेवरच सदर बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच दफनविधी करण्यात आला. त्यावेळी वनपाल सुनील पाटील, प्रशांत पाटील, प्रसाद भारुडे, नाकेदार गणेश खंडारे, वनरक्षक प्रल्हाद काळे, अशोक ठोंबरे, संदीप चौधरी, संदीप पाटील, सुनील चिंचोले, अतुल पाटील यांच्यासह वन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.