पोलीस अधीक्षकांनी काढले २० जणांचे आदेश ; जळगाव शहर ठाण्याला सर्वाधिक ३ पीएसआय
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या २० उपनिरीक्षकांच्या विवीध पोलीस स्टेशनला नेमणूक केली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी सोमवारी उशिरा काढले आहे. यात जळगाव शहर पोलीस स्टेशनला सर्वाधिक ३ उपनिरीक्षक लाभले आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने जळगांव जिल्हयात जिल्हयांतर्गत प्रशासकिय कारणावरुन तसेच जळगांव जिल्हयात परिक्षेत्रांतर्गत सार्वत्रिक बदल्यांमधे जळगांव घटकात नव्याने पीएसआय हजर झालेले आहे. (केसीएन)तसेच पोलीस उप निरीक्षक या पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या पोलीस उप निरीक्षक यांची कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने, जनहितार्थ, नवीन नेमणुक मध्यावती प्रशासकिय बदली/पदस्थापना करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.
त्यानुसार २० उपनिरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात नेमणूक दिली आहे. या अधिकाऱ्यांना तत्काळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. नवीन मनुष्यबळ मिळाल्यामुळे पोलीस ठाण्यांना नवीन बळ मिळणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक व त्यांना मिळालेले ठाणे
दिपाली नंदराम पाटील (महिला तक्रार निवारण कक्ष), मंगला वेताळ पवार (अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कक्ष), शांताराम पंडित पाटील (दहशतवाद विरोधी पथक, जळगाव), काशिनाथ श्रावण कोळंबे (डायल ११२,नियंत्रण कक्ष, जळगाव), हिरालाल गुमान ठाकरे, अण्णासाहेब भागवत फोडसे, राजू विठ्ठल जाधव (सर्व जळगाव शहर पोलीस स्टेशन), युवराज वेडू बागुल (अमळनेर), महेंद्र प्रल्हाद पाटील (नियंत्रण कक्ष), रामदास बाबुराव गांगुर्डे (वरणगाव स्टेशन), विजय प्रभाकर देवरे (चोपडा शहर), मधुकर नारायण उंबरे (पाळधी दुरक्षेत्र),(केसीएन) हिरामण धर्मराज महाले (धरणगाव पोलीस स्टेशन), संजय दशरथ राऊत (नशिराबाद), प्रवीण अशोक परदेशी (चाळीसगाव ग्रामीण), दत्तू रामनाथ खुळे (कासोदा पोलीस स्टेशन), राजेंद्र दामोदर महाले (नियंत्रण कक्ष), मंगेश वाल्मीक दराडे (भुसावळ तालुका), ज्ञानेश्वर झुंबर धात्रक (मुक्ताईनगर), मोहम्मद कमरुद्दीन शेख (फत्तेपुर पोलीस स्टेशन).