जळगाव तालुक्यातील भादली रेल्वेस्थानकाजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील तरूण हा धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता भादली रेल्वे स्टेशन जवळ उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अविनाश सुरेश देवरे (वय २७ रा. नशिराबाद ता.जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई प्रमिलाबाई., वडील सुरेश देवरे, लहान भाऊ अनिल आणि लहान बहिण असा परिवार आहे. (केसीएन) जळगाव एमआयडीसीतील सिध्दार्थ केमीकल कंपनीत तो कामाला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी अविनाश देवरे हा कामाला निघून गेला. त्यानंतर भादली रेल्वेस्टेशन जवळ रेल्वे रूळ ओलांडत असतांना तो धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. (केसीएन) त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. अविनाश हा घरात मोठा असल्याने कमवता होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







