रावेर तालुक्यातील कर्जोद येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कर्जोद शेती शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कर्जोद शेती शिवारातील सोनलाल प्रजापती यांच्या गट नं. २९० मधील शेताच्या बाजुला असलेल्या नाल्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह बुधवारी सकाळी नाल्यातील पाण्यात तरंगतांना व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या इसमाचा नाल्यातील पाण्यात बुडून मरण पावल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मयत पुरुष नेमका कुठला याचा तपास पोलिसांतर्फे परिसरातील गावात घेतला जात आहे. याबाबत संतोष प्रजापती याने दिलेल्या खबरीवरून रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.








