चाळीसगाव तालुक्यात पावसाने नुकसान
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाटणादेवी येथे मुसळधार पावसामुळे मंगळवारी दि. २० ऑगस्ट रोजी नदीला पूर आल्याने काही भाविक पुलाच्या पलीकडे अडकून पडले आहेत. तसेच कन्नड घाटात काही ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता बंद आहे. प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
मंगळवारी पाऊस पडल्यानंतर चाळीसगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तर कन्नड घाटात पावसाने दरड कोसळली. यामुळे वाहतूक बंद झाली. दरम्यान, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कन्नड घाटाची पाहणी केली. घाटात काही भागात दरड असून ओल्या स्थितीत असल्यामुळे वाहतूक काही वेळ सुरु करू शकत नाही असे आदेश तहसीलदार यांनी दिल्यामुळे कन्नड घाट वाहतूक बंद आहे. फक्त दुचाकी वाहतूक सुरु आहे. दुचाकीवर प्रवास करतांना काळजी घ्या, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. तसेच, पाटणादेवी येथे आज जोरदार पाऊस पडला. नदीला पूर आल्याने काही भाविक पुलाच्या पलीकडे अडकले. त्यांना बाहेर काढण्यात येत होते.