धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील जिल्हा कारागृहातून शनिवारी जामिनावर सुटल्यानंतर घरी जात असताना एका तरुणावर तिघांनी चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे.
उमाकांत सुरेश पाटील (वय ३८, रा. सुंदरपट्टी, अमळनेर) असे जखमी तरुणांचे नाव आहे. शनिवारी दि. १७ रोजी जिल्हा कारागृह, जळगाव येथून जामीन झाल्याने उमाकांत हा जळगाव येथून परत अमळनेर येथे ट्रिपल सीट मोटरसायकल जात होता. दुपारी दोनच्या सुमारास चिंचपुरा गावाजवळ स्पीड ब्रेकरवर कोणीतरी दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात उमाकांत गंभीर झाला असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. दरम्यान, हल्लेखोर अमळनेर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ववैमन्यासातून हा हल्ला झाला आहे. धरणगाव पोलिसांनी तपास सुरु केला असून संशयितांना अटक करण्याची कार्यवाही सुरु होती.