जळगाव- येथील गोदावरी नर्सिंग महाविद्याालयातील विद्यार्थी कल्याण विभागातर्फे नशा मुक्त अभियानांतर्गत उपस्थितांनाा शपथ देण्यात आली.
ड्रग फ्रि इंडिया कॅम्पेन अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या समन्वयिका प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. स्वाती गाडेगोने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देशातील व्यसनाधिनतेचे प्रमाण लक्षात घेता नशा मुक्त अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने नशा मुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या बी.एससी द्वितीय वर्षाच्या ९२ विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची शपथ दिली. तसेच नशेमुळे होणारे नुकसान याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.











