जळगाव ;- गोदावरीच्या विविध संस्थामध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स ह्या महाविद्यालयात लायब्ररी सप्ताह निमित्ताने लायब्ररी जनक डॉ. एस. आर रंगनाथन ह्यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी उल्हास पाटील लॉ कॉलेजचे लायब्ररीयन श्री. इश्वर राणे यांनी डॉ. रंगनाथन यांच्याविषयी माहिती दिली, व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयी विद्यार्थीनींना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली याप्रसंगी प्रिन्सिपल सौ. कविता देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. लायब्ररीयन सौ. कविता भोरटके यांनी आभार मानले, तसेच सौ. तेजस्विनी चौधरी, सौ. जयश्री कुलकर्णी, रेणुका सुर्यवंशी व समृद्धी सराफ हा शिक्षक वृंद उपस्थित होता.
डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालय
डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालयात एस आर रंगनाथन यांच्या जयंती दिन ग्रंथपाल दिन म्हणून सजरा करण्यात येतो, त्या निमित्त महाविद्यालया मध्ये ए आय टुल्स ह्या विषयावर बाह्य मार्गदर्शक मा. हितेश ब्रिजवासी यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कायद्याच्या अभ्यासात कसा करता येईल व त्याचे फायदे तोटे प्रत्यक्षीका सहित समजावून सांगितले . कार्यक्रमाची सुरवात डॉ. एस आर रंगनाथन ह्याच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नयना. एन. महाजन हे होते. तर कार्यक्रम डॉ. ईश्वर एस राणे यांनी आयोजीत करून सूत्र संचालन ऋतुजा बिडे ह्या विद्यार्थिनीने व आभार प्रदर्शन शिवानी महाजन हिने केले. तसेच कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.