रत्नागिरी (वृत्तसंस्था) – जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने दुसरीच्या विद्यार्थिनी बरोबर अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्य वेल्हाळ असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. गुहागर तालुक्यातील जानवले येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. त्या शिक्षकांवर 376 अतंर्गत गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक उद्य वेल्हाळ सुरूवातीला फरार होता. यानंतर नराधम शिक्षकाला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोधून चांगलाच चोप दिला. आता शिक्षकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. दरम्यान पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.