एरंडोल तालुक्यातील सावदे प्रचा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील सावदे प्र. चा. या गावामध्ये एका कामगाराच्या डोक्यात दगड घालून व बैलगाडीचे शिंगाडे मारून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार दि. ११ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
इंदल प्रकाश वाघ (वय २७, रा. सावदे प्र.चा. ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. सावदे गावातील खदानीत काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. (केसीएन)दरम्यान, त्याची पत्नी व मुलगी माहेरी गेली होती. तर शनिवारी रात्री तो घरीच होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास तो काही कामानिमित्त बाहेर गेला. त्यानंतर तो घरी आलाच नाही.
आज रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी सावदे गावातील जॉगिंगला जाणाऱ्या काही तरुणांना सावदे बस स्थानकाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पाळधी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची माहिती घेतली. इंदल वाघच्या डोक्याच्या डाव्या बाजूला व कानावर गंभीर वार करण्यात आलेले आहेत.(केसीएन)तसेच ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी डॉ. निरंजन देशमुख यांनी सकाळी ८ वाजता तपासून मयत घोषित केले.
या वेळेला कुटुंबीयांनी आक्रोश केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाळधी, धरणगाव तसेच एरंडोल पोलीस स्टेशनच्या याप्रकरणी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सावदा गावाचे पोलीस पाटील पवार यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी धरणगाव पोलीस निरीक्षक पंकज देसले, प्रभारी एपीआय प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आला . .तसेच शासकीय रुग्णालयात देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान तरुणाचा खून कोणी केला याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.