भडगाव (प्रतिनिधी ) : शहरातील शिवाजीनगर भागातील महिलांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
भडगाव शहरात याआधी बेबाताई यांनी अलीकडेच आपल्या समर्थकांसह वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यांच्याच पुढाकाराने आता शहरातल्या शिवाजीनगर भागातील असंख्य महिलांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैशालीताई सुर्यवंशी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आले असल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रवेश सोहळ्याला वैशालीताई सुर्यवंशी, मनोहरदादा चौधरी, योजनाताई पाटील, बालूअण्णा, जबरसिंग राजपूत, आबा कासार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









