जामनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली असून सदर योजनेच्या जामनेर विधानसभा मतदारसंघ निहाय ११ सदस्यांची समिती बनवण्यात आली आहे. सदर समितीच्या तालुका अध्यक्षपदी रवींद्र रमेश झाल्टे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
सदर समितीमध्ये शासकीय सदस्य व अशासकीय सदस्य व सदस्य सचिवपदी तहसीलदार आहे. महिलांना सविस्तर माहिती देऊन त्यांचे फॉर्म व्यवस्थित भरून पूर्ण करू असे उदिष्ठ पूर्णतःवास नेऊ असे प्रतिपादन रविंद्र झाल्टे यांनी केले. रवींद्र झाल्टे यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधनाताई महाजन, एज्युकेशन सोसायटीच्या सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,आतिश झाल्टे, दीपक तायडे यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.