जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना, मेहरूण परिसरातील एकनाथ नगर येथे शोककळा
सुमित पाटील
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगर येथील महाविद्यालयीन तरुणीने धावत्या रेल्वे खाली डाऊनलाईन वर झोपून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेची नोंद घेत आहेत.
प्रियंका अरुण गोसावी (वय २४, रा. एकनाथ नगर, मेहरूण परिसर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मेहरूणमध्ये एकनाथ नगरात परिवारासह राहत होती. तिचे जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण सुरू होते. (केसीएन) दरम्यान बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ती महाविद्यालयात गेली असल्याची माहिती मिळाली. तर आज दुपारी जळगाव तालुक्यातील म्हसावद ते डोमगाव रत्यालगत तिने तिची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीआर ६८८९) लावल्यानंतर तिने म्हसावद गावाजवळ असलेल्या रेल्वे गेट हाकेच्या अंतरावर असलेल्या डाऊन लाइनवर खांबा क्रमांक ९ ते १३ च्या रुळावर स्वतःला झोकून देत काशी एक्सप्रेससमोर आत्महत्या केली.
दरम्यान रुळावरील गॅंगमनला घटना समजताच त्यांनी स्टेशन मास्तरला कळविले . त्यावरून रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तरुणीची बॅग, मोबाईल आढळले. (केसीएन)त्यात महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे आढळून आली. त्यावरून तिची ओळख पटली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला देखील माहिती मिळताच पोहेकॉ प्रदीप पाटील, पोकॉ मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली . मयत तरुणीच्या आढळलेल्या कागदपत्रावरून तिची ओळख पटली.
पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांना माहिती दिली असून दरम्यान मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते. तरुणीने आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट आहे.या घटनेची नोंद जीआरपी पोलिसांकडे करण्यात येत असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे .