जळगाव (प्रतिनिधी) : तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा साहित्यकला संमेलन-२०२४, शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आले. यात जळगाव येथील कवियत्री माधुरी प्रशांत भट यांना स्वरचित चारोळी व दोन स्वरचित कविता यासाठी मान्यवरांच्या हस्ते तीन पारितोषिक व रोख बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.
संमेलनाचे उदघाटन संभाजीनगर च्या विद्यमान धर्मदाय उपायुक्त प्रमिलाताई श्रीनिवार, हॅपी सायन्स संस्थेचे पश्चिम आशिया अध्यक्ष कोटा नागुची (जपान), ज्येष्ठ साहित्यिक फ.मु.शिंदे, जेष्ठ साहित्यिका छाया महाजन, जेष्ठ साहित्यीक भवान महाजन, सतीश इंदापूरकर(जेष्ठ दिग्दर्शक) प्रशांत होर्षिळ (निर्माता-दिग्दर्शक ) ,जेष्ठ दिग्दर्शक, नाटककार, शिळवादक ,लेखक,गायक मधू घाणेकर, प्रियाताई दामले (तितिक्षा प्रतिष्ठान), सुनीताताई कावसानकर(संपादिका-युगंधर प्रकाशन) ह्यांचे हस्ते पारितोषिक व पुरस्कार प्रदान करण्यात आले.