जामनेर तालुक्यातील मालदाभाडी विद्यालयातील ग्रीन आर्मीचा उपक्रम
जामनेर (प्रतिनिधी) : झाडे ही मानवाच्या जन्मापासुन ते मरेपर्यंत सच्च्या मित्राप्रमाणे साथ देतात या भावनेने प्रेरित होऊन मैत्री दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी शाळेत वृक्षांना ४०० पेक्षा जास्त फ्रेंडशिप बँड बांधले. शाळेतील ग्रीन आर्मी स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष करूणा महाजन या होत्या.
अरुण पाटील, नितीन पाटील प्रमुख अतिथी होते. परीसरात काळसड, हिवर, भोकर, टेंभुर्णी या सारख्या दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प ग्रीन आर्मीने केला आहे अशी माहिती ग्रीन आर्मीचे प्रमुख विजय सैतवाल यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक्षा खराटे, सुत्रसंचलन जागृती बोरसे तर आभार कुणाल कोळी यांनी मानले. कार्यक्रम कार्यक्रम यशस्वितेसाठी जी टि पाटील, आर. एल. कोळी, एन. एस. पाटील, मनोज जैन यांसह ग्रीन आर्मी स्वयंसेवक दिव्या मंगळकर, कोमल बाविस्कर, रोशनी काळे सागर पालोदे, संदेश खुरपडे, कार्तिक बडगुजर, लिना बडगुजर, वैष्णवी चिमकर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल शाळेचे प्र.मुख्याध्यापक एस.आर्.शिकोकारे व पंचक्रोशीतील मान्यवरांनी कौतुक केले आहे.