राजस्थानी समाजाचे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात राजस्थान समाजाची संख्या ४५ ते ५० हजार आहे. समाजातील बहुतांश लोक हे उद्योग व्यवसायात आहेत. त्यांना अनेकदा राजस्थानात व्यावसायिक कामासाठी जावे लागत असते. त्याकरिता जळगाव ते किशनगढ (अजमेर) अशी हवाईसेवा सुरु करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राजस्थानी समाजाने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांना केली आहे.
राजस्थानी समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहे. राजस्थान येथे उद्योग व्यवसायानिमित्त व्यापाऱ्यांना जावे लागत असते. तसेच, राजस्थानात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने पर्यटनासाठी देखील चांगली संधी आहे. तसेच राजस्थान येथून अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठीदेखील पर्यटक ये-जा करीत असतात. तसेच, नागपूर व पुणे येथील हवाई अड्डा येथून राजस्थानात दररोज फ्लाईट जात असते.
पुणे येथून जळगावमार्गे जर हवाईसेवा सुरु राहिली तर राजस्थानी बांधवाना सेवा मिळणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना रतन सारस्वत, नारायण ओझा, सागर ओझा, मनोज प्रजापत, विजया पांडेय, शंकर शर्मा, उदयराम जोशी, मंजीत जांगिड आणि राजस्थान समाजाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.