उपमुख्याध्यापकपदी आर.एल.पाटील यांची नियुक्ती
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पी.एम. वाघ या नियत वयोमानानुसार दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्या रिक्त पदावर मुख्याध्यापक म्हणून संस्थेने एन. आर. ठाकरे व उपमुख्याध्यापक या रिक्त पदावर आर.एल.पाटील यांना संस्थेचे चेअरमन संजय वाघ व व्हॉ.चेअरमन व्ही.टी. जोशी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आला.
याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका पी.एम.वाघ, मुख्य लिपिक अजय सिनकर, आकाश वाघ हे उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संस्थेचे मानद सचिव ऍड.महेश देशमुख, व्हा.चेअरमन व्हि.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.