प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येणार जिल्हा दौऱ्यावर
जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात तयारीला लागण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक निरीक्षक, तालुक्याला एक प्रभारी तर दोन सहप्रभारी अशा ५६ जणांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जळगाव दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यासाठी प्रभारी म्हणून आत्माराम जाधव, सहप्रभारी दिलीप शेंडे, देवीदास ठाकरे तर निरीक्षक म्हणून संजय पाटील, भडगावसाठी शांताराम पाटील, डॉ. अनिरुद्ध साळवे, वाडीलाल चव्हाण तर आत्माराम जाधव. पाचोरा – गोकूळ बोरसे, महेश पाटील, सुधाकर कुमावत, जामनेर मुन्नावर खान, राजेश मंडोरे, प्रवीण सुरवाडे व सुभाष जाधव, बोदवड डॉ. जगदीश पाटील, शरद पाटील, विवेक नरवाडे व ज्ञानेश्वर कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर – हरिश गनवाणी, वीरेंद्रसिंग पाटील, डॉ. ऐश्वरी राठोड, रावेर-शरद पाटील, जमील शेख, शेखर पाटील, यावल के. डी. चौधरी, धनंजय चौधरी, संजय जमादार व जमील शेख, अमळनेर अर्चना पोळ, प्रदीप देशमुख, ज्ञानेश्वर कोळी. चोपडा संदीप घोरपडे, डी. डी. पाटील, सखाराम मोरे व गोकूळ बोरसे, पारोळा-विजय महाजन, राहुल मोरे, अमोल राऊळ व संदीप घोरपडे, एरंडोल चंद्रकांत पाटील, राजेंद्र महाजन, गजेंद्र साळुंखे, धरणगाव- सुलोचना वाघ, राजेंद्र पाटील, मगन पाटील, जळगाव ग्रामीण- रवींद्र कांडेलकर, मूलचंद नाईक, उद्धव वाणी व विजय महाजन, भुसावळ-मौलाना मुफ्ती हारुन, अमोल भिरुड, मनोज देशमुख व डॉ. जगदीश पाटील यांच्यावर भार देण्यात आला आहे.