जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : घरात सर्व जण असताना तरुणाने तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दिनांक २८ जुलै रोजी रात्री जेवणासाठी भाऊ त्याला बोलवायला गेला त्या वेळी ही घटना समोर आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
केतन राजेंद्र भोई (२१, रा. म्हसावद, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. केतन भोई हा कंपनीत काम करणारा तरुण आई, दोन भावांसह राहत होता. (केसीएन)रविवारी रात्री जेवणाची वेळ झाल्याने केतन समोर दिसत नसल्याने त्याच्या आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल लागत नव्हता. त्याला पाहण्यासाठी भाऊ वरील मजल्यावर गेला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबीयांनी एकाच हंबरडा फोडला.
कुटुंबीयांनी व शेजारच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.