पॅरिस (वृत्तसंस्था ) शनिवारी भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
१० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ खेळाडू होते. फायनलमध्ये सुरुवातीला ५ शॉट्सच्या दोन सीरिज असतात (प्रत्येक शूटरसाठी ५ + ५ शॉट्स (एकूण १० शॉट्स). २५० सेकंदात एक शॉट्स पूर्ण करणे गरजेचे असते. यातील प्रत्येक २ शॉट्सनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक मिळेपर्यंत सर्वात कमी गुण मिळवणारा नेमबाज स्पर्धेबाहेर होत गेला. भारताची मनू भाकर सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकावर होती. कोरियाची खेळाडू अव्वल क्रमांकावर होती. मग मनूची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन शूटर्संनी वर्चस्व कायम ठेवत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. अखेर मनूला कांस्य पदक जिंकता आले. लक्षणीय बाब म्हणजे शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.