• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव परिमंडल: पंतप्रधान सुर्य घर योजनेचे ४१७० प्रस्ताव मार्गी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव परिमंडल: पंतप्रधान सुर्य घर योजनेचे ४१७० प्रस्ताव मार्गी

अंमलबजावणीसाठी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) : घरगुती ग्राहकांचे वीज बिल शुन्यावर आणणारी पंतप्रधान सुर्य घर योजना ही केंद्र आणि राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महावितरणकडे येणाऱ्या लाभार्थी आणि इतर घटकांना त्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करुन लोकांचा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यात विद्युत यंत्रणेस तत्पर राहण्याच्या सुचना दिल्या.

बैठकीत महावितरणच्या सर्व उपविभागातील क्वालिटी कंट्रोलचे अभियंते उपस्थित होते. योजनेच्या संदर्भाने महावितरणकडे येणाऱ्या प्रस्तावावर सर्वेक्षण, टेक्निकल फ़िजिब्लीटी तपासणे आणि प्रस्तावांना मान्यता देणे, तसेच त्याबाबतचे अहवाल अग्रेशीत करण्याची जबाबदारी क्वालिटी कंट्रोल व शाखा अभियंत्यांची असते. महावितरणकडे आलेल्या प्रस्तावावर सर्वेक्षण व टेक्निकल फ़िजिब्लीटी तपासून मान्यता देण्याचे काम शीघ्रगतीने करावे. अशा सुचना मुख्य अभियंता मुलाणी यांनी यावेळी दिल्या. (केजीएन)जळगाव परिमंडलात फ़ेब्रुवारी अखेरीसपासून जून २०२४ पर्यंत ४३९० प्रस्ताव प्राप्त असून ४१७० प्रस्तावांना मान्यता देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त प्रस्तावात धुळे – ९२७, जळगाव – २८०२, तर नंदुरबार जिल्ह्यातील ४४१ प्रस्तावांचा समावेश आहे. उर्वरीत प्रस्तावांवर सर्वेक्षण आणि टेक्निकल फ़िजिब्लीटी तपासणीचे काम सुरु आहे.

पंतप्रधान सुर्य घर योजना वीज ग्राहकांसाठी मोठी फ़ायदेशीर आहे. या योजनेसाठी शासनाचे अनुदान आहे. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून सुर्य प्रकाशापासून वीजनिर्मिती करण्याच्या या योजनेत एक, दोन आणि तीन किलो वॅटसाठी अनुक्रमे ३०,०००, ६०,००० व ७८००० हजार रुपयांची सबसीडी आहे. या योजनेच्या अमंलबजावणीसाठी बॅंकाकडून सवलतीने कर्ज व्यवस्थाही करण्यात येत आहे.(केजीएन) छतावर सौर पॅनल बसवून वीजनिर्मितीच्या प्रकल्पात एक किलोवॅटला महिन्याला सरासरी १२०, दोन किलोवॅटला २४० युनिट तर तीन किलोवॅटच्या प्रकल्पातून महिन्याला सरासरी ३६० युनिट वीज निर्मिती होते. सर्वसाधारणपणे घराच्या वीजवापरापेक्षा या सौर पॅनल मधून अधिकची वीज उत्पादन होते. घरात वापरून शिल्लक राहिलेली वीज महावितरणला विक्री करता येते. शिवाय विजेचे बिल शुन्यावर येऊ शकते. योजनेत भाग घेण्यासाठी नागरिकांनी pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करण्याचे आव्हानही मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaonsuryaghar yojna
Previous Post

खरीपासाठी एक रुपयात पीक विमा योजनेला मुदतवाढ

Next Post

राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक

राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon