सातारा (वृत्तसंस्था) – येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे ८ करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

हे ८ रुग्ण बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये तरडगाव (ता. फलटण) येथील ६७ वर्षीय महिला व ६ वर्षाचा मुलगा, फलटण येथील ३३ वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील १३ वर्षांची मुलगी, कोडोली (ता. सातारा) येथील १८ वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील २३ वर्षीय युवक, त्रिपूटी (ता. कोरेगाव) येथील ३६ वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरशिंगे या गावचा १८ वर्षीय युवक असे एकूण ८ जणं करोनामुक्त झाले आहेत.
त्यांना आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यातील १०६ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.







