अर्थसंकल्पाचा परिणाम असल्याची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर २ हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. मंगळवारी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात लागलीच घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे.
सोने- चांदीवर आधी १० टक्के कस्टम ड्युटी होती. तर प्लॅटिनमवर आधी इम्पोर्ट ड्युटी १५ टक्के होती. मात्र निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सोन्यावर लागणारी कस्टम ड्युटी ६ टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. हि घोषणा झाल्यानंतर लागलीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे २५०० रुपयांनी कमी झाले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात २२ जुलैला सोन्याचे भाव प्रति १० ग्रामला ७३ हजार ३०० रुपये इतके होते. यानंतर आज हेच दर ७० हजार ५०० रुपये इतके खाली आले आहेत.
सोन्याचे भाव कमी झाले असून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोने आणि दागिने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पुण्याच्या सराफ बाजारात देखील दर कमी झाल्याचे पाहण्यास मिळाले. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्के आणि प्लॅटिनमवर ड्युटी ६.४ टक्के केली. अनेकजण सुवर्ण पेढ्यांमध्ये खरेदीसाठी येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.









