जळगाव (प्रतिनिधी ) ;यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन मार्फत जळगांव शहरातील रेल्वे स्टेशन परिसर भागात -दिनांक १९ जुलै २०२४ रोजी मोफत ४,००० रोप वाटप करण्यांत आले. यावल वनविभाग आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या संयुक्त विदयमाने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमे अंतर्गत मोफत रोप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यांत आला. या कार्यक्रमाचे उदिदष्ट पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे होते. कार्यक्रमामध्ये फळ झाडांची तरोध इतर प्रकारच्या झाडांची रोपे वाटप करण्यांत आली. उपस्थितांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि वृक्षारोपणासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावल वनविभागाचे वरीष्ठ अधिका-यांनी आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि पर्यावरणाच्या संरक्षणसाठी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले. तसेच सहभागी नागरीकांना रोपांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यांतल्या. उपस्थितांनी रोपे स्वीकारुन पर्यावरणाच्या सरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.
कार्यक्रमांस विशेष अतिथी म्हणुन जळगांव शहराचे आमदार,राजु मागा भोळे, जमीर एम.शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव, प्रथमेश वि. हाडपे सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा, श्री स्वप्लि फटांगरे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व, श्री सुनिल मिलावे, वनक्षेत्रपाल यावल पश्विम, यांनी सुध्दा नागरीकांना रोपे वाटप केलीत. तसेच या कार्याकमाचे प्रेरक म्हणुन जमीर एम.शेख, यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले.