जळगाव एलसीबीची पारोळ्यात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा शहरात बॅग चोरी करणारी टोळी आली असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने पारोळा शहरात तपासणी केली. या ठिकाणी या टोळीचा म्होरक्या एलसीबीला सापडला आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पो.हवालदार नंदलाल पाटील व पोना भगवान पाटील यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली. दोन दिवसापुर्वी पारोळा शहरातील स्टेट बँक परीसरातील पैशाची बॅग चोरी करणारी टोळी पुन्हा पैशाची बॅग चोरी करण्याच्या ईरादयाने पारोळा शहरात संशयीरीत्या फिरत आहे. (केसीएन)त्यावरुन एलसीबी पथकाने गोपनीय माहीतीवरुन पारोळा शहरातील धरणगाव माथाळा भागात एका संशीयत इसमास सापळा रचुन ताब्यात घेतले.
सदर इसमास चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बसंत बनवारीलाल शिसोदिया (वय ३० वर्षे रा. कढीयागाव ता. पचोर जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश) असे सांगितले. त्याची त्याच ठिकाणी अंगझडती घेतली असता त्याचेकडे रोख रक्कम रुपये ३,१८,०००/- मिळुन आले. सदर पैशाबाबात विचारणा केली असता त्याने दोन दिवसापुर्वी पारोळा शहरातील स्टेट बैंक परीसरात त्याच्या गावातील साथीदार रिशी सिंगदर सिसोदीया व विशाल ऊर्फे मोगली सिसोदीया (रा. गुलखोडी ता. पचोर जि. राजगढ) अशांनी मिळून पैशाची बॅग चोरी केल्याचे सांगितले.(केसीएन)सदर पैशाच्या बॅग चोरीचा म्होरक्या असल्याचे सांगुन तो पारोळा शहरात पुन्हा एकदा चोरी करण्याकरीत आला असल्याचे सांगितले.
तसेच त्याने यापुर्वी पाचोरा, धरणगाव जिल्यात अशाच प्रकारच्या पैशाच्या बॅगा चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन त्याने पारोळा पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन व पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याचे कबुल केले. संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया यास पोराळा पोलीस स्टेशन येथे मुददेमालासाह पुढील गुन्हयाच्या तपासाकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई एसपी डॉ. महेश्वर रेड्डी, कविता नेरकर, अपर पोलीस पोलीस अधीक्षक, व सुनिल नंदवाळकर उपविभागीय पोलीस अधिकारी अंमळनेर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखाचे बबन आव्हाड, पोउनि राहुल तायडे, पोउनि गणेश वाघमारे, पोहवा नंदलाल पाटील, पोहवा प्रमोद लाडवंजारी, पोहवा किरण धनगर, पोना भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोकों ईश्वर पाटील, चालक पो कॉ प्रमोद ठाकुर यांनी केली.