जळगाव जिल्ह्यातील यावल येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दि 19 रोजी मंगळवारी संध्याकाळी यावल शहरातील 59 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोट आला होता. दोन दिवसापासून जळगाव कोव्हीड रुग्णालयात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होता.रात्री 1 वाजेच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यू मध्ये भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 346 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 39 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती सुत्रांकडून कळते आहे.