जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली -बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयालामाध्यमिक विद्या मंडळ संचलित ,बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव. आयोजित राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2023- 24 या स्पर्धेमध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर प्रतियोगितेमध्ये महाराष्ट्रातून 163 शाळांनी सहभाग नोंदविला होता. या शाळांमधून मूल्यमापनातून अंतिम 41 शाळांची निवड करण्यात आली. त्यात ग्रामीण भागातून विद्यालयाची निवड करण्यात आली. 20 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गांधी तीर्थ येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले . या प्रसंगी मंचावर ज्येष्ठ अणूवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, डॉ.सुदर्शन अय्यंगार (माजी कुलगुरू गुजरात विद्यापीठ )यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष. माननीय अशोक अस्वार ,उपाध्यक्ष . .दिलीप बारी, संचालक निलेश खलसे, प्रवीण पाटील, रामकृष्ण धनगर ,अर्जुन काटोले ,रघुनाथ फुसे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक .राजेंद्र आंबटकर, समन्वयक सौ .भारतीय ठाकरे मॅडम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी मंचावर.अशोक जैन ,(चेअरमन जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड जळगाव) गिरीश कुलकर्णी ,(गांधी विचारा अभ्यासक )हे उपस्थित होते .हा पुरस्कार मिळवण्यासाठी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.