भिरढाणे फाट्याजवळ गॅस टॅंकर व लक्झरी बस भिषण अपघातात 7 जण होरपळून मयत मयतांची ओळख पटली.
धुळे – मुकटी कासविहिर जवळील नागपूर सुरत राष्ट्रीय क्रं 6 महामार्गावरील भिरढाणे फाट्याजवळ दि.(18)रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान धुळ्याहुन जवळगावकडे जाणारा गॅस टॅंकर क्रं.MH 40/ BJ 9793 व जळगावहुन धुळ्याकडे येणारी खाजगी लक्झरी बस क्रं.MH 01/DQ 5495 यांच्यात भिषण अपघात झाला.दोन्ही वाहनांनी काही मिनिटांतच पेट घेतला. आगीत दोन्ही वाहने पुर्ण जळून खाक झाली.फक्त सांगाडाचा शिल्लक राहिला.दोन्ही वाहनांचे नंबर जळाले होते.
तालूका पोलीसांनी महेनत घेऊन वाहनांचे नंबर व जळालेल्या नागरीकांची ओळख पटविली आहे.अपघातात आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला आहे.याबात मिळालेली माहिती.
दोन्ही वाहनांचे नंबर
1)गॅस टॅंकर क्रं.MH 40/ BJ 9793
2) लक्झरी बस क्रं.MH 01/DQ 5495.असे आहेत.
सगळ्या मृतांची ओळख पटली आहे.त्यांची नावे.
1.टँकर ड्रायव्हर राजकुमार बोनी राम सरोज वय 45 राहणार जोनपुर उत्तर प्रदेश लक्झरी बस ड्रायव्हर
2.रुपेश सुधीर लंबोर वय 35राहणार मालवण सिंधुदुर्ग
3.संतोष वसंत तेली वय 36 राहणार कणकवली सिंधुदुर्ग
टँकरमधील प्रवासी
4.कृपाशंकर छोटेलाल जैस्वाल वय 48
5.हिरालाल बनारसी वय 55
6.दीपक रामबली वय 21
7.अखिलेश कुमार संतोष कुमार वय 20 सर्व राहणार घाटकोपर मुंबई
अशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.टँकर मधील प्रवासी हे मुंबईवरून नागपूर येथे व तिथून पुढे उत्तर प्रदेश बनारस येथे जाणार होते.अशी माहिती तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सागर काळे यांनी दिली आहे.
लक्झरी बस चालक विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.