90 हजार रुपये रसायने जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) सिंगापूर कंजर वाडा परिसरात आज रोजी सायंकाळी सहा वाजता अवैध गावठी हातभट्टी दारु चालवणाऱ्या लोकांनावर कारवाई करण्यात आली. असून 90 हजार रुपये किमतीची गावची दारू पकडण्यात आलेली आहे. गीता राकेश बागडे व बिंदिया गणेश बागडे त्यांचेवर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंद सिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अशोक संगत, नितीन पाटील ,दीपक चौधरी ,निर्भया पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी मंजू शर्मा, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, निलेश पाटील, भूषण सोनार तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.