एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील उमाळा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीची अल्युमिनियम तार व लोखंडी पोल चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत पोलिसांनी तपास करून रावेर व जामनेर तालुक्यातील संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
उमाळा भागातील सेक्ट्रम कंपनीच्या परीसरातील शेतातील महावितरणची लाईन हि कोणीतरी अज्ञात ईसमाने दिनांक 3 जुलै रोजी रात्री चोरी ५२० मीटर अल्युमीनीयम तार व चार लोखंडी पोल हे चोरी केले होते.(केसीएन)म्हणुन सदर चोरीबाबत वायरमन धनराज शांताराम भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरची चोरी ही महावितरणमध्ये झिरो वायरमन म्हणुन काम करणारा दत्तु नागो पाटील (रा. रावेर ह.मु अयोध्यानगर, जळगाव) तसेच विनोद वामन हिवरे (रा. केकतनिंभोरा ता. जामनेर) यांनी केले असल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळाली. (केसीएन)त्याप्रमाणे दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडुन सदर गुहयातील २६० मीटर अँल्युमीनीयम तार जप्त करण्यात आली असुन त्यांना न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सरकार तर्फे अँडव्होकेट अविनाश पाटील यांनी कामकाज पाहीले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पो.हे.का गफ्फुर तडवी, रामकृष्णा पाटील, सचिन मुंडे, सिध्दश्वर डापकर, गणेश ठाकरे, संदीप धनगर अशांनी केली आहे.









