जळगाव (प्रतिनिधी ) ;- लायन्स क्लब जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण विषयी डॉ. श्रद्धा चांडक यांनी सखोल मार्गदर्शन केले. वय वर्षे 9 ते 18 वयोगटातील मुलींना गर्भमुखाचा मुखाचा कॅन्सर म्हणजे काय तो कशाने होतो दरवर्षी महिलांमध्ये गर्भमुखाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त असते. त्याचे मुख्य कारण काय? एचपीव्ही नामक विषाणूच्या संसर्गाबद्दल ही माहिती दिली. तसेच त्या आजाराचा प्रतिबंध करता येईल अशा लसीची माहिती दिली व विद्यार्थिनींना सदरची लस मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याच्यासोबत लायन्स क्लब प्रोजेक्ट चेअरमन आनंद श्री श्री माळ, प्रकल्प प्रमुख किशोर बेहेराणी हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस आंबटकर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी जी कुलकर्णी यांनी केले मुख्याध्यापकआर. एस . आंबटकर यांनी कॅन्सर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती. एस.पी दुबे , एस ए. भदाणे, ए.आर .निकम उपस्थित होते.