बारामती (वृत्तसंस्था ) ;- गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. नानासाहेब महाले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज बारामतीमधील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नानासाहेब महाले हे राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष आहेत, मात्र त्यांनी आज राष्ट्रवादीला रामराम करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.