जळगाव तालुक्यातील किनोद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार दि. ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोपाळ नारायण सपकाळे (वय-३०, रा. किनोद ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोपाल सपकाळे हा आई उर्मिला, पत्नी माधुरी, एक भाऊ, दोन मुलं आणि विवाहित बहिण यांच्यासह गावात वास्तव्याला होता. शेती व मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवारी दि. २ जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. नातेवाईकांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी दि. ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधिकारी सुशांत निकुंभ यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.









