जळगावच्या सिध्दीविनायक नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सिध्दीविनायक नगरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या एका ३० वर्षीय मुलाची ऑनलाईन टास्कच्या नावावर तब्बल ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि. १ जूलै रोजी उघडकीस आली आहे.
अमोल दिलीप बिरारी (वय ३०, रा.सिध्दीविनायक नगर जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. अमोल हा खासगी व्यवसाय करतो. दि. २२ जून ते १ जुलै दरम्यान या युवकाची फसवणूक करण्यात आली. सोशल मीडियाचा वापर करुन निमीशा रघुराम असे नाव सांगणाऱ्या महिलेने तिच्या टेलीग्राम खात्यावरुन अमोलच्या टेलीग्राम खात्यावर संपर्क साधला तसेच पार्टटाईम जॉब देण्याचे आमीष दिले.
तसेच रॅंक ॲप ५२५३ या टेलीग्राम चॅनलकडून संपर्क साधला. फिर्यादी अमोल कडून ८ लाख ७६ हजार ३६३ रुपये सायबर भामट्याने स्वीकारले. मात्र रक्कमेतून एकही रुपयाची परतफेड केली नाही. दिलेली रक्कम परत मिळत नसल्यानंतर, अमोलला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमोलने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यावरून निमीशा रघुराम नावाच्या अज्ञात मुलीविरुध्द या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरुन बिएनएस ॲक्ट २०२३ प्रमाणे ३१८ (४), ३ (५) आय.टी.ॲक्ट कलम ६६ (डी) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करत आहेत