सात पाहुण्याच्या उपस्थितीत जुळल्या सात जन्माच्या गाठी ; आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक
रावेर ता.रावेर सध्या देशभर कोराना या जिवघेण्या व्हाँयरसच्या विषाणूने हैदोस घातला असून त्यामुळे साऱ्याचे नियोजन कोलमडले असून लाँकडाऊन आणी संचारबंदीमुळे सार्वजनिक उत्सव बंदी घातलेली आहे. या बंदीमुळे काहिना आपले विवाह लाबणीवर टाकले असले तरी बंहूतांश जण सरकारने दिलेल्या आदेशा नुसार घरगुती पद्धतीने विवाह सोहळा उरकुन घेण्यावर भर देत आहेत आश्याच पद्धतीने विवरे खुर्द ता.रावेर येथे आज दिनांक १९ मे रोजी अत्यंत साध्या पद्धतीने घरातच विवाह सोहळा पार पडाला. यावेळी घरात प्रवेश करणाऱ्या नातलगानवर सँनेटायझर फवारणी स्प्रेद्वारे करण्यात आली ज्ञानेश्वर भास्कर तेली (आसटकर) यांचे पुत्र राहूल व भुसावळ येथील विलास जगन्नाथ निंबाळकर यांची सुकन्या पुजा हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले . यावेळी केवळ वधु व वराचे आई वडील मामा ब्राम्हण अशा मोजक्या लोकांची उपस्थिती होती. यावेळी फिजीकल डिस्टीनसिंगचे पालन करुन मास्कचा वापर करण्यात आला . होता या आदर्श विवाहाचे विवरे बुर्द सह सर्वत्र कौतुक होत आहे. फैजपुर येथील प्रांताधिकारी डाँ.अजीत थोरबोले यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाच हजाराचा चेक दिला. प्राताधिकारी यांनी नवविवाहीतांना शुभेंच्छा दिल्या. यावेळी विवरे बृर्द चे सरपंचपती राजु पाटील,पोलीस पाटील योगेश पाटील,योगेश चौधरी मुरलीधर लोणारी चुंचाळे ता.यावल येथील पत्रकार प्रकाश चौधरी, भुसावळ किरण निंबाळकर,राकेश चौधरी,विक्की निंबाळकर,जयदीप चौधरी आदी उपस्थित होते.