जळगावात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ३५ वर्षीय महिलेला टेलीग्राम व इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून तब्बल ४ लाख ८९ हजार ४०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना २८ जून रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती शनिवारी २९ जून रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
35 वर्षीय महिला र्टेलीग्राम व इंटरनेटच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने दि. १४ एप्रिल ते दि. २८ जून दरम्यान संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन अज्ञात व्यक्तींनी केला. त्यानंतर त्यांना काही टास्क पुर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळे कारण सांगून तब्बल ४ लाख ८९ हजार ४०० रुपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केली. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शनिवारी दि. २९ जून रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करीत आहे.