पाणलोट क्षेत्रात १९२ मिलिमीटर पाऊस
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण हे जळगाव जिल्ह्यातील मोठे धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच आजपर्यंत १३०० मिलिमीटर पाऊस झालेला आहे.हतनूर धरणाचे सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.
शनिवारी दि. २९ जून रोजी सकाळी ६ हजार १४५ क्युसेक्स विसर्ग झाला आहे. २०४. २० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हतनूर धरणातून जळगाव एमआयडीसी, भुसावळ नगरपालिका, यावल सिंचन क्षेत्रासाठी, दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रासाठी, रेल्वेसाठी पाणीपुरवठा केला जातो. या पाणलोट क्षेत्रात १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत १३०० मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हतनूर परिसरात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे आगमन झाल्यामुळे हतनूर धरणाची पातळी कायम ठेवण्यासाठी हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेली माहिती मिळत आहे. धरणामध्ये ५२. ६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.