१२ बकऱ्या चोरीनंतर दुसऱ्या दिवशी घडली चोरीची घटना ; चोरांचा सुळसुळाट वाढला !
जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील पाथरी येथे १२ बकऱ्या चोरटयांनी कार मधून कोंबून चोरून नेल्याचा प्रकार घडल्याच्यानंतर पुन्हा पाथरी गावातील बसस्टँड परिसरात असणाऱ्या मंदिरातील मारोतीच्या दोन मुर्त्यांवरील १० ते पंधरा हजर रुपयांचे चांदीचे दोन मुकुट अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार आज २९ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या सलग चोरीच्या घटनांमुळे गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, पाथरी गावात बसस्टॅण्डजवळ मारोतीचे मंदिर असून एक लहान मारोतीचे जुनी आणि एक मोठी मूर्ती बसविण्यात आली असून गावकऱ्यांनी लोकवर्गणीने दोन्ही मारूतींना चांदीचे मुकुट बसविले होते. २९ जूनच्या मध्यरात्री १ ते ४ वाजेदरम्यान चोरीचा हा प्रकार घडला आहे . आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना मारुतीचे चांदीचे मुकुट आणि डोळे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर हि बाब गावाचे पोलीस पाटील संजय लंगरे यांना कळविल्यानंतर त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविल्याने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान पाथरी येथील दगडू लोटन धनगर यांच्या १२ बकऱ्या इंडिका कारमध्ये घालून अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दि. २७ जून रोजी पहाटे घडली होती. हि घटना ताजी असतांनाचोरटयांनी गावातील मारोती मंदिरातून चोरट्यांनी चांदीचे दोन मुकुट आणि डोळेचोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.