जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या पर्यवेक्षिका एस.पी. दुबे हया होत्या.
एस.पी. दुबे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी विचार मांडले. इ.५ वी ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या सामाजिक कार्याविषयी लोकहितवादी, सामाजिक न्याय शैक्षणिक कार्याविषयी भाषणातुन मनोगत व्यक्त केले. त्यात घोडके दिव्या भरत, बारी दिपाली हरिचंद्र, पिंजारी फिरदोस अजीज, काळे भूमिका ज्ञानेश्वर, बारी मोहित अनिल, बारी रेवती कैलास, गिरणारे दिव्या किशोर इ. विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे परीक्षण म्हणुन शाळेच्या उपशिक्षीका एन.सी. वाणी यांनी केले. तसेच राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. कला शिक्षक ए.टी. बावस्कर व एस.एन. ताडे यांनी ही स्पर्धा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जी.बी. काळे यांनी केले. आभार प्रदर्शन डी.जी. कुलकर्णी यांनी केले.