आंतरजातीय विवाहाचे कारण : परस्परविरोधी २९ जणांवर गुन्हे दाखल
यावल शहरातील बसस्थानक परिसरात सकाळची घटना
यावल (प्रतिनिधी) : शहरात बसस्थानक परिसरात फैजपूर रस्त्यावर बुधवारी दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता तरुणाने फेब्रुवारी महिन्यात आंतरजातीय विवाह केल्याचा राग उफाळून आला. तरुणावर बंदूक रोखून त्याला चाकूने व फायटरने मारहाण करीत जबर जखमी करण्यात आले. याप्रकरणी १८ जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटाने देखील फिर्याद दिली असून ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील आकाश मधुकर बिऱ्हाडे (वय २३, रा. सिद्धार्थ नगर, यावल) याने फिर्याद दिली आहे. तरूणाने दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसर्या समाजातील तरूणीशी विवाह केला. यामुळे त्या तरूणाला मुलीच्या माहेरच्या मंडळीकडून नेहमीच धमकावण्यात येत होते. यातच बुधवारी दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास या तरूणाला बस स्थानकाच्या समोर मुलीच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. यात बंदूक रोखून धरत धमकावतांना फायटरने मारून चाकूने वार करण्यात आले. यात तरूण गंभीर जखमी झाला. दरम्यान, भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेताच हल्लेखोरांनी पळ काढला.
या प्रकरणी सदर तरूणाने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रवीण सुरेश बारसे, निरू प्रविण बोरसे, विनोद शिवदास गारु, अजय लाडू सारस, मयूर मनोज गारु, विक्रांत उर्फ गोलू मनोज गारु, कामरान रुपचंद गारु यांच्यासह आणखी ११ अशा एकूण १८ संशयित आरोपींवर कलम ३०७, १४३, १४८, १४९, ३४१, ३२३, ५०४, १३५, आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास एपीआय विनोदकुमार गोसावी करीत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला विरोधी गटातर्फे चंद्रकांत उर्फ अजय नेमचंद सारस यांनी फिर्याद दिली आहे. यात संशयित आरोपी आकाश मधुकर बिर्हाडे, गौरव गजरे, अर्जुन अडकमोल, सर्फराज पठाण, विजय गजरे, अशोक गोरेकर व इतर ५ अशा ११ जणांवर कलम १४३, १४७ ते १४९, १२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास पोहेकॉ उमेश सानप करीत आहेत.